वडगाव मावळ:
वडगाव मावळच्या शिवराज हाॅटेल जवळ पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आयसर टेम्पोने अचानक पेट घेतला. भरधाव वेगाने जाणा-या टेम्पोने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर एकच धावपळ उडाली.
आकुर्डी तील हा टेम्पो होता,लोणावळ्यावरून पुणे च्या दिशने चालला होता,सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास शिवराज जवळ येतातच टेम्पोने पेट घेतला.
जवळ असणा-या नागरिकांनी आणि महामार्गावरून जाणा-या नागरिकांनी पेटल्या टेम्पोचा बर्निंग थरार अनुभवला. महामार्गावरील वाहने जागेवर ठप्प झाली. टेम्पोने पेट घेताच शिवराज हाॅटेलचे मालक अतुल वायकर यांनी वडगाव पोलिसांना माहिती दिली
वडगाव मावळ पोलीसांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागाला कल्पना दिली. अवघ्या आठ मिनिटात आग विझविण्यासाठी बंब घटनास्थळी दाखल झाला आणि पेटलेला टेम्पो विझवायला सुरुवात केली.

error: Content is protected !!