वडगाव मावळ: टाकवेतील एकहजार आठ कुटुंबातील नागरिकांनची आरोग्य तपासणी करण्यात आली.माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील एक हजार आठ कुटुंबातील ४३६४ नागरिकांनची आरोग्य तपासणी करण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांनची आॉक्सीजन पातळी,तापमान तपासणी यावेळी करण्यात आली. यामध्ये ४ रुग्ण संशयित आढळले असुन त्या पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला .असुन उर्वरित तीन व्यक्ती चे अहवाल निगेटीव्ह आला, असुन सध्या त्यांना कोरोटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत चालेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशा नुसार नागरिकांनच्या आरोग्य तपासणी करण्यात आली तपासणी करण्यासाठी शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या साह्याने सर्वेक्षण पार पडले.
ग्रामविकास अधिकारी सुभाष भांगर, सरपंच भूषण असवले, उपसरपंच संतु दगडे,पोलीस पाटील अतुल असवले,सदस्य सोमनाथ असवले,दत्तात्रय असवले, सदस्या सुवर्णा असवले, ज्योती आंबेकर,यांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.

error: Content is protected !!