वडगाव मावळ:
कोरोना बाधीत रुग्णांवर उपचाराच्या सर्व सुविधा मिळाव्यात.रेमडेसीव्हीरच्या इंजेक्शन सह वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. शासनाने घोषित केलेल्या अनुदानाचे तातडीने वाटप करण्यात यावे याकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष वेधले आहे.
भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,
संघटक सरचिटणीस अॅड.धमेंद्र खांडारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोरोना या साथीच्या रोगामुळे पुणे जिल्हयात उद्भवलेल्या परिस्थिती बाबतचे गांभीर्य मांडले आहे.
भेगडे व खांडारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपला देश,राज्य या बरोबर संपुर्ण जिल्हात कोरोनाने थैमान घातलेले आहे.रोज हजारो रुग्ण नव्याने बाधीत होत आहे. रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड,वैदयकिय स्टाफ,औषधे या अभावी उपचार मिळेनासे झाले आहेत. परिणामी जिल्हयात मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे.
यासाठी आम्ही काही मागण्या व सूचना.आपणाकडे करीत आहोत
● कोरोना बाधित रूग्णांना सध्या बेड,ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.
हॉस्पिटल मधील उपचारांअभावी रूग्ण घरीच दगावत आहेत ही गंभीर बाब आहे.शहरात व ग्रामीण मध्ये
कोणत्या हॉस्पिटलला किती बेड शिल्लक आहेत,हे रोजच्या रोज जाहीर करावे म्हणजे रुग्णांना योग्य
ठिकाणी उपचारासाठी दाखल होता येईल.
●ग्रामिणमधील अनेक हॉस्पिटलमधील ऑक्सीजन संपलेला आहे.त्यांना तो त्वरीत व मुबलक प्रमाणात
उपलब्ध करून देणेत यावा.ऑक्सीजन अभावी रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.अनेक हॉस्पिटल
रूग्णांना ऑक्सीजन नसल्याने दुसरीकडे जाण्यास सांगत आहेत.
● व्हेंटीलेटर बेडचा खुपच तुटवडा जाणवत आहे.कृपया तो उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले
उचलण्याची गरज आहे.
●सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे रेमडिसिविर इंजेक्शनचा या इंजेक्शनचा मोठया प्रमाणात तुटवडा
असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे ते मिळविण्यासाठी दमछाक होते आहे. अनेकांना हे नातेवाईक याचना
करीत आहेत. परंतु ते मिळू शकत नाही.आमची मागणी आहे की,सर्व हॉस्पिटलमधील रूग्णाची संख्या पाहुन
त्या हॉस्पिटलाच त्वरीत हा इंजेक्शनचा साठा पुरविण्यात यावा.यात काळाबाजारही मोठया प्रमाणात सुरू आहे.
त्यातील दोषींवर ताबडतोब कायदेशिर कारवाई व्हावी. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करताना भेदभाव न
करता जिथे जशी आवश्यकता आहे.त्याप्रमाणे तो पुरवठा करावा,
●सध्या लॉकडाऊन असल्याने सरकारने रिक्षावाला,फेरीवाला,बारा बलुतेदार यांना ज्या पॅकेजची घोषणा केली आहे .ती ताबडतोब अंमलात आणुन मदतीचे वाटप करण्यात यावे.
●सर्वच हॉस्पिटलमध्ये वैदयकीय स्टाफची कमतरता जाणवत आहे. मेडीकल कॉलेजचे डॉ.विदयार्थी शेवटच्या
वर्षात शिकत आहे.त्यांनाही अशा गरज असलेल्या हॉस्पिटलमध्ये मदत करण्यास सांगून कामावर घ्यावे.
वरीलप्रमाणे आमच्या मागण्या व सुचना असून त्या त्वरीत अंमलात आणाव्यात.
मौजे कारेगाव ता.शिरुर जि.पुणे येथील कोविड सेंटर श्री मोरया जल्टोस्पेशालिटी हॉस्पिटल चे नावाने बोगस डॉक्टर श्री महेश पाटील उर्फ मेहमुद.फारुक शेख चालवित होता. सदर हॉस्पिटलवर पोलिस कारवाई करुन
दि.१२/०४/२०२१ रोजी सदर कोविड सेंटर बंद करण्यात आले. त्या ठिकाणी असलेले कोविड पेशंट अन्यत्र हलविण्यात आले सदर कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण.दगावले असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. वास्तविक अशा बोगस डॉक्टरची
शहनिशा न करता कोविड सेंटरला परवानगी देणा-या संबंधित तालुका वैद्यकीय.अधिकारी आणि संबंधीत सक्षम अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी .म्हणुन
आपणास दि.१२/०४/२०२१ रोजी निवेदन दिले तरी सुध्दा अद्याप कारवाई का झाली.नाही? अशा बेजबाबदार अधिका-यांना प्रशासन पाठीशी घालत आसल्यामुळेच.आपल्याकडुन दि.१७/०४/२०२१ रोजी काढलेल्या परीपत्रकातील अ.क्र. ५५ अन्वये
सदर बंद पडलेल्या कोवीड सेंटरला श्री मोरया हॉस्पिटलला सहा(६) रेमडेसिव्हरचे वाटप केले .गेले ही बाब अतिशय गंभीर तर आहेच कडक कारवाईस देखील पात्र आहे.
आज रेमडेसिव्हरसाठी रुग्ण तडफडत आसतांना प्रशासन हलगर्जीपणा दाखवत असेल तर त्यावर कारवाई केलीच पाहीजे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणास करीत आहे.
जर ताबडतोब कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन.करु कृपया याची नोंद घ्यावी. माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते प्रविण दरेकर, खासदार गिरीष बापट यांना या निवेदनाची प्रत माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.

error: Content is protected !!