वडगाव मावळ:
मॅजिक बस  इंडिया फाऊंडेशन ही संस्था गेल्या वीस वर्षापासुन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतभर आणि इतर देशात कार्यरत असणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे.
भारतामधील २२ राज्ये,८० जिल्हे आणि १२ ते १८ वयोगटातील जवळपास ३८०००० शालेय मुलांसोबत कार्यरत आहे.सन २०१० पासून संस्था पुणे जिल्हामध्ये मावळ,खेड.पुरंदर,दौंड,मुळशी या तालुक्यामध्ये शालेय मुले,,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत,शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत कार्यरत आहे.संस्थेच्या विविध प्रकल्पाद्वारे मुलासोबत समस्या सोडवणे,संवाद कौशल्य,शिकण्यातून शिकणे,गटामध्ये काम करणे,स्व व्यवस्थापन या सारख्या जीवन  कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम खेळाच्या मध्यमातून शिकवले जातात.त्याच सोबत खेळाच्या स्पर्धा,वित्त शिक्षण,करियर ओळख व मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाविषयी काम केले जाते.
संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील कामाची पार्श्वभूमी मध्ये  पुणे जिल्यामधील  मुले,युवक,यांच्या शिक्षण ते रोजगार या प्रवासामधीलविविध टप्प्यावर मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात भरीव योगदान देण्यात आले आहे.
संस्थेच्या कार्याचा शेक्षणिक क्षेत्रांतील प्रवास विचारात घेता आणि कोरोना आजारामुळे जगभर उद्भवलेली परिस्तिथी बघता मुलांना आणि युवकांना जर शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या  मुळ प्रवाहामधून बाहेर जाऊन दयायचे नसेल तर सध्या त्यांच्या कुटुंबाची उपजीविकेची साधने वाचविणे.
ती अधिक सक्षम किंवा पूर्वस्थिती मध्ये  आणणे  हे अत्यंत गरजेचे आहे.हि गरज ओळखून  पाईपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व  मॅजिक बससंस्थेने पुढाकार घेऊन पुणे जिल्यामधील मावळ तालुक्यातील कशाळ,किवळे ,कुणेवाडी,माळेगाव बुद्रुक ,माळेगाव खुर्द,पिंपरीवाडी ,सावळा या सात गावांची निवड करण्यात आली आहे.
या गावामधील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्तिथी मुळे ज्या  कुटुंबाची उपजीविकेची  साधने प्रभावित झाली आहेत . ज्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले आहेत. अशा कुटुंबाची निवड करून त्या कुटुंबांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना बाबत त्या कुटुंबात जनजगृती करणे,शासकीय योजना त्या कुटुंबाना शासनाच्या सहकार्याने  कशा प्रकारे मिळतील,या बाबत पाठपुरावा करणे ,कुटुंबातील  युवकांसाठी काही कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व त्यांच्या रोजगाराबाबत प्रयत्न करणे  ,महिला बचत गटाना व्यवसायाकडे कसे आणता येईल या बाबत नियोजन करणे.सर्व कुटुंबांचे जनधन बँक खाते काढण्यासाठी लोकांना पोत्साहित करणे.
शाळेतील मुलांना जीवन कौशल्य शिकवणे जेणे करून मुलाची शाळेची आवड टिकून  राहील व करोना परिस्तिथी निवळल्या नंतर मुले शाळा बाह्य न होता शाळे मध्ये टिकून राहतील. पालकांच्या उपजीविकेच्या साधना मुले मुलाचे शिक्षण प्रभवित होऊ नये या साठी पाईपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या सहकार्याने   मॅजिक बससंस्थेने मॅजिक बस कोविड -१९ जलद ग्रामीण पुनर्प्राप्ती २०२०-२०२२ हा प्रकल्प हातात घेतला आहे.
सदर प्रकल्पाचे उपक्रम राबवितांना शासनाच्या कोविड – १९ मार्गदर्शक सूचना जसे सामाजिक अंतर, मास्क व सानिटायजर वापर इत्यादी चे काटेकोर पालन केले जाते.

error: Content is protected !!