टाकवे बुद्रुक:
पावसाळ्यात कांद्याची लसणाची साठवण करायची म्हणजे त्याला गांजवा लागतो, हा गांजवा विण्याची एक कला आहे.असे गांजवे विणकामे करणारी मंडळी क्वचितच.
गावात एखादा दुसरा माणूसच असे गांजवे विणून देतो आणि तेही कुठलाही मोबदला न घेता. अगदी आपले पणाने माणूसकीने गांजवे विणले जातात याचा मुख्य उपयोग कांदा किंवा लसूण साठवायला. आजची परिस्थिती बदलली आहे.
हाताला काम मिळाले,शिवारात पाणी खळळते. धान्याची आणि भाजी पालाची सुबकता आली आहे. पण पूर्वी आर्थिक परिस्थिती नाजूक होती. पावसाच्या पाण्यावर पिकेल अशी भात,नाचणी,सावा,वरई अशीच पिक येत होती.
ग्रामीण भागातील पश्चिम भागात येत होती. अशा काळात भाजीपाला कमी शिजवला जायचा. चूलवर शिजायची कडधान्ये,सुकवलेले मासे,बोबील,सुकट,अंडी,मटण शिजायचे. कांदा,लसूण बाजारातून विकत आणायचा. आणि मग तो जपून वापरायचा. घरातील कर्ती बाई,घराची कारभारीण,भाजीला फोडणी देता येईल इतकाच कांदा या गांजवेतून बाहेर काढायची,लसणाची एखादी कांडी घ्यायची. आमटीला,कालवाणला फोडणी द्यायची. हा गांजवा,घराच्या छप्पराला,माचोळीला,माळयाला अडकून ठेवायचा.
घरातील सुगरण सोडून कोणाच्या हाताला कांदा लागू नये,म्हणून कांदा वर गांजव्यात अडकून ठेवायचा हा यातील एक भाग दुसरा भाग असा आहे,मावळात मुसळधार पाऊस पडतो,जमिनीवर, घराच्या कोप-यात कांदा साठवला की,पाणी लागून थंड हवेने कांदा नासतो.
त्याला माजघरात वर टांगून ठेवला की,कांदा खराब होत नाही ही त्या मागील धारणा होती. हे सगळ आता सांगण्याची काय गरज.
दोन महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. लाॅकडाऊन मुळे खेडोपाडी नागरिक घरातच बसून आहे,ऐवढा मोठा दिवस घरात बसून करायचे काय? दिवसाचा सदुपयोग झाला पाहिजे म्हणून कुसवलीतील
मारूती रढे हा कारगीर गांजवा काढताना दिसला.
त्याचे काम सूरू होते आणि त्याच्या सोबत गावातील वयस्कर बाया बापडे गप्पा मारीत होती.
जसा गांजव्याचा उपयोग कांदा,लसूण साठवायला होतो,तसा शिक.याचा उपयोग दही,दूध आणि ताकाचे मडके,त्यात ठेवून ते सुरक्षित ठेवता येत. आजच्या पिढीला गांजवा,शिक दाखवले पाहिजे आणि त्याचे उपयोग समजून सांगायला पाहिजे.

error: Content is protected !!