वडगाव मावळ:
लाॅकडाऊन पडले त्यामुळे कुठे जाणं नाही की येण नाही, आपल घर भल आणि आपल काम भल, कुसवलीतील भगवान भालेराव , जयराम डिखळे,ज्ञानोबा भालेराव या खेड्यातील सर्वसामान्य माणसांचे म्हणणे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, रूग्णालयात बेड मिळत नाही,ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसीव्हीर इंजेक्शन घ्यायला नातेवाईकांची मोठी धावपळ उडत आहे.
कोव्हिड सेंटरच्या बाहेर रूग्णांची गर्दी वाढू लागली आहे, लसीकरणाचा वेग वाढवयला प्रशासकीय पातळीवर कामाची गती वाढली आहे. पोलीस शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.
लोकप्रतिनिधीं कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे. समाजातील सगळया घटकांकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.
लाॅकडाऊन करून शासन कडक नियम घालून देत आहे, हे करीत असताना जनजागृती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वारंवार धुवा. सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना देत आहे.
या सुचनाचे काटेकोर पणे पालन सर्वसामान्य नागरिक करीत आहेत, आता हेच बघा. भगवान भालेराव आणि जयराम डिखळे कुसवली सारख्या दुर्गम गावातील मंडळी. हे दोघेही शेतकरी आणि कारागीर.
यांची कारागीरी म्हणजे बांबूच्या काडया पासून टोपली, पाटी, हारा, कणीग काढायची.
या सगळ्या गोष्टी शेतक-यांच्या उपयोगाच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या. हे दोघेच त्याच्या सारखी ही कारागिरी करणारी अनेक मंडळी खेडोपाडी आहेत, त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात घरबसल्या ही कामे सुरू केली आहेत.
ना शहरात भटकंती ना बाजाराला येणेजाणे घरी थांबून ही विणकामे ते करीत आहे. टोपलीची किमत १०० रुपये,पाटी ची २०० ,खुराडे ४०० रूपायाला,हारा ३००.कणीग ५०० असे विक्रीचे दर आहेत.
कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठेतील गर्दी कमी झाली पाहिजे.
शासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे,हे करताना सामाजिक बांधिलकी मानून अशा वर्क फार्म होम ची कामे करणाऱ्या वडील धा-यांच्या कामाचे अनुकरण केले पाहिजे.

error: Content is protected !!