तळेगाव स्टेशन:
आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने पाच टक्के स्वनिधीतून ग्रामपंचायत हद्दीतील एकोणीस दिव्यांग बांधवाना अनुदान वाटप केले.
सरपंच संगीता घोजगे,उपसरपंच सागर शिंदे,
माजी उपसरपंच बाबासाहेब घोजगे, पोलीस पाटील
भानुदास दरेकर, ग्रामसेवक बालाजी सूरवसे,उद्योजक समीर जाधव उपस्थितीत होते.
कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता शासनाने लाॅकडाऊनचे हत्यार उपसले आहे. अनेकांच्या हाताला काम नाही,त्यातच दिव्यांग बांधवांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते,त्यामुळे तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवाना अनुदान वाटप केले गेले,आंबीतही या अनुदानाचे वाटप झाले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,सोशल डिस्टन ठेवावा,नियमित हात धुवावे,सकस आहार घ्यावा,पुरेशी विश्रांती घ्यावी अशा सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या.

error: Content is protected !!