मुबई:
राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेल ने प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षओबीसी सेलच्या प्रदेश कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली. या बैठकीत ते बोलत होते .
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणीचे सदस्य यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती व त्यावर सरकार करीत असलेल्या उपाययोजना याबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पक्षसंघटना कशी मजबूत करावी,ओबीसी समाजाला न्याय मिळून देण्यासाठी कसा पुढाकार घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.
•राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या इच्छा-आकांक्षा याचा अभ्यास करावा व ते शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून द्यावा.
•जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले ओबीसी समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना कार्यकर्ते व नेते जे राजकारणी नाहीत परंतु ओबीसी समाजासाठी झगडत असतात अशा लोकांशी सुसंवाद जिल्हाध्यक्षांनी करावा.
•ओबीसी घटकातील छोट्यातील छोट्या घटकाला व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी शासन दरबारी झगडावे
•प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी युवक, महिला यांची फळी निर्माण करावी.
•जिल्ह्यात ओबीसी समाजात कार्य करणाऱ्या सर्व ओबीसी समाजाच्या संघटना त्यांचे नेते यांना विश्वासात घेऊन कार्य करावे.
•जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी निर्माण कराव्यात.
•अकार्यक्षम कार्यकर्त्यांना काढून त्या ठिकाणी नवीन जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी .
•ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यात वेळोवेळी बैठका घेऊन तेथील कार्याचा अहवाल ओबीसी प्रदेशाध्यक्षांनी मार्फत पाठवावा.
•२०२४ ची निवडणूक लक्षात ठेवून पक्षबांधणीसाठी पक्ष व सरकार यांनी ओबीसी साठी केलेली कार्य व सरकारी योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवावी.
• राष्ट्रवादी ओबीसी मध्ये पदी देताना ओबीसी च्या प्रत्येक घटकाला त्यात सामावून घ्यावे. यासह अनेक सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी केल्या. ओबीसी सेल सोशल मीडिया प्रभारी अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले . ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी आभार मानले

error: Content is protected !!