टाकवे बुद्रुक:
दोन भावांचा प्रपंच सुखात चालेले ऐवढी वडिलोपार्जित जमीन,या काळ्या आईची सेवा करीत,घाम गाळात त्यांनी चाळीस वर्षापूर्वी शिवारात पाणी घेऊन शेती फुलवली, त्यामुळे ते जुने बागायतदार अशी त्यांची ओळख असणे स्वाभाविक आहे.
या बागायतदार ओळखीला त्यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात बस्तान बसून नावलौकिक कमावले, हे करताना कष्ट आपसूक आलेच.
ते टाकवे बुद्रुक गावचे जमीनदार,अंद्रायणी नदीच्या काठी त्यांची लालमातीची जमीन ,त्यात चाळीस वर्षापूर्वी त्यानी बागायत शेती पिकवायला सुरुवात केली. टाकवे बुद्रुकचे कै.लक्ष्मण रामा घोजगे आणि त्यांचा भाऊ विठ्ठल रामा घोजगे यांनी शेतीला दूधाची जोड दिली. त्याकाळी शंभर ते दीडशे पोती भात हे दोघे भाऊ पिकवायचे.
पारंपारीक वाण असलेल्या कोळंबी ,चिमणसाळीला फारसा भाव नव्हता,पण वर्षभर पुरून विकता येईल इतके पीक व्हायचे. त्या जोडीने त्यांनी नदीकाठी बागायत सुरू केली. बागायत रेघरूपेला येते ना येते,तोच आंद्रा धरणासाठीच संपादन सुरू झाले. या संपादनात तेवीस एकर जमिन धरणासाठी संपादित झाली.
घोजगे कुटुंबियांनी शेती सोबत दुधधंद्या वाढायला सुरुवात केली होती.
सायकलवरून वडगाव रेल्वे स्टेशन गाठून पुन्हा लोकलने पुण्यात ते दूध पोहचवत होते,ताडीवाला रोड लडकतवाडी त्यांनी दूध घातले. पुण्यात किरकोळ विक्री करून ते दूध विकायचे. वावरात पिकलेला कांदा,वांगी,कलिंगड,बटाटा,मका विकला गेला.
सगळया कुटूंबानी शेतीवर अवलंबून राहू नये म्हणून घोजगे परिवारातील चिंधू लक्ष्मण घोजगे, बबूशा विठोबा घोजगे,बाळासाहेब विठोबा घोजगे, दत्तात्रेय लक्ष्मण घोजगे,काळूराम विठोबा घोजगे यांनी नोकरी करता करता वेगवेगळ्या व्यवसायात स्वतःला झोकून.
व्यवसाय लहान मोठा हे न पाहता.
कुटुंबांतील सर्वाच्या हाताला काम मिळेल आणि गाठीला चार पैसे शिल्लक राहतील या हेतूने सूरू केलेल्या व्यवसायातून समृद्धी उभी राहीली,लक्ष्मी आनंदाने नांदू लागली,गाठीला जमलेल्या चार पैशातून घरदार सावरले आणि समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढली. शेती आणि दूध व्यवसायातून सुरू झालेल्या प्रपंचात आज मदतीला हाॅटेल,किराणा दुकान,भाजीपाला दुकान,पानटपरी, दूध डेअरी आणि सोबतीला ठेकेदारीही मिळाली.
दत्तात्रेय लक्ष्मण घोजगे म्हणाले, आमची चाळीस वर्षापूर्वी बागायत शेती होती,आंद्रा धरणग्रस्त असल्याने शेतीकडे पाहण्याचा कल काहीसा बदलला होता,पण आता आम्ही पुन्हा बागायती शेतीकडे वळलो आहे,पुन्हा नव्याने सुरुवात करीत आहोत,आजमितीला बाजारी भरभरून वाढली आहे,तर पंधरा गुंठयात पेरलेली कोथिंबीर जोमाने वाढत आहे. शेतीला जोड धंद्याची साथ दिली तर सगळ्यांच्या हाताला काम मिळेल या मतावर आम्ही ठाम आहे.

error: Content is protected !!