मुलीवर प्रेम प्रकरणाचा घेतला संशय

वडगाव मावळ:
आपल्या पोरींचे बाहेर अफेअर आहे,या संशयावरून
जन्मदात्या बापाने दोन लेकीची ट्रक खाली चिरडून हत्या केली. आणि स्वतं चालत्या ट्रक खाली उडी मारून जीव दिला, या घटनेने मावळ तालुक्यातील इंदोरी पंचक्रोशीत हादरली आहे.
इंदोरी मावळ येथील अल्फा नगरी सोसायटी राहणारे  भरत भराटे (वय ४५) याने मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संशय घेत . घरा समोर  स्वतः च्या दोन मुलींना धावत्या ट्रूक खाली झोपवून त्यांची हत्या केली.
स्वतः देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार इंदोरी येथे रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला.
काळोख्या अंधारात तीन जीव काळाच्या पडद्याआड गेले.जन्मदात्या बाप भरत भराटे (वय ४५), नंदनी भराटे (वय १९) तसेच तिची लहान बहीण वैष्णवी भराटे (वय १४) या तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
या प्रकरणी मुलींची आई सपना भरत भराटे (वय ३६, रा. सावडी ता. करमाळा जि सोलापूर सध्या राहणार इंदोरी मावळ)  यांनी फिर्याद दिली आहे 
मुलींचे कोठे तरी बाहेर अफेअर चालू आहे असा संशय भरत भराटे याला आला होता. मुलीच्या अश्या वागण्याने नाव खराब होईल या पेक्षा जीव दिलेला बरा असे मयत आरोपी भरत याने पत्नी  सपना भराटे हिला बोलून दाखवले होते.
रविवारी (दि.१८) पहाटे एक वाजल्याच्या सुमारास दोन्ही मुलींना रोड वर झोपण्यास संगीतले आणि स्वतः च्या मालकीची ट्रक( एम एच १२ एच डी १६०४) भरत भराटेने चालू करून दोन्ही मुलींच्या अंगावर घालून त्यांना चिरडून त्यांची निर्घृण हत्या केली. स्वतः चालू ट्रक खाली उडी मारून आत्महत्या केली असे माहिती फिर्यादी पत्नी सपना यांनी दिली 

error: Content is protected !!