तळेगाव दाभाडे : 
शासनाने लॉकडाऊन सुरु केला आहे, गरीब व गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौक येथे पाच रुपयात जनसेवा थाळी उपक्रमाचे उद्घाटन रुग्णवाहिका चालक अनिल कारके यांच्या हस्ते करण्यात आले.
या जनसेवा थाळी ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .१ मेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून जर लॉक डाऊन वाढला तर जनसेवा थाळी उपक्रम लॉकडाऊन मध्ये सुरूच राहणार असे नियोजक अनिल कारके व श्याम मोहिते यांनी सांगितले.
जनसेवा समिती विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष  किशोर आवारे म्हणाले,”
मावळात  रुग्ण संख्या वाढत असुन सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांची या लॉकडाऊन मध्ये गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकवेळ जेवणाची थाळी उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या  उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम दुपारी १२:३० ते २:३० वा. यावेळेत सुरु असणार आहे. रविवार व बुधवार अंडा करी तर इतर दिवशी चपाती, भात, भाजी, लोणचे तसेच पिण्याचे पाणी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
यावेळी जनसेव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, अनिल पवार, किशोर कारके, नगरसेवक निखिल भगत, संतोष शिंदे, संतोष दाभाडे, समीर खांडगे, सुनील कारंडे,  चिराग खांडगे, विकास पवार, सतीश ढेंबे, अनिल कारके, मुन्ना जाधव, सुनील जैन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल व लाभार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!