
वडगाव मावळ:
वीकेंड लाॅकडाऊनला मावळात भरभरुन प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार ठप्प होते. वीकेंड लाॅकडाऊन मुळे द्रुतगती महामार्गावर व राष्ट्रीय महामार्गावर विरळ वाहतूक होती. ठिकठिकाणी पोलीसांनी बॅरिकेटर्स लावून नाकाबंदी केली होती.
राज्यभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवारी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला.
तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वडगाव मावळ,तळेगाव दाभाडे,देहूरोड,देहू,कामशेत,लोणावळा,पवनानगर,सोमाटणे,टाकवे बुद्रुक,इंदोरीत बाजारपेठा बंद होत्या,काही ठिकाणी पोलीसांनी सूचना देऊनही अर्ध शटर उघडे ठेवून चोरून व्यवसाय करणा-या काही जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
लाॅकडाऊन मुळे बाजारपेठा बंद असल्याने नेहमी सारखी वर्दळ नव्हती, याचे अनेकांनी स्वागत केले. जीवापेक्षा जगात काहीच मोठे नाही,आपला आणि आपल्या कुटूबाची काळजी घेण्यासाठी वींकेडला असलेला लाॅकडाऊन फार महत्वाचा असल्याच्या भावना अनेक जाणकारांनी व्यक्त केल्या.
बाजारपेठेतील गर्दी कमी असली तरी अत्यावश्यक कामासाठी चाललो आहे,असे सांगून अनेक जण पोलिसांना चुकवून फिरत होते,ते पोलिसाची नजर चुकवून फिरत असले तरी यात त्यांचे अहित आहे याकडे ते कानाडोळा करीत आहे. वीकेंड अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले,वाचन,टिव्ही पाहणे,गाणी ऐकेने,पत्तेचा डाव मांडणे स्वीकारले.
