तळेगाव दाभाडे:
सोमाटणे येथील उद्योजक गोरखशेठ माळी यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते..मावळ तालुक्यातील शेलारवाडी हे त्यांचे मूळ गांव..तळेगांव आँर्डनस डेपो येथे शासकीय नोकरी करुन ते सेवानिवृत्त झाले होते.शेलारवाडी येथील सावतामाळी मंदिराच्या उभारणीत त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता..त्यांच्या निधनाने सोमाटणे व शेलारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
तरुणपणी शेलारवाडी येथे भाजीचा धंदा करुन त्यांनी उदरनिर्वाह केला होता..शासकीय सेवेत आल्यानंतर वीटभट्टीच्या माध्यमातून उत्तम व्यवसाय करत त्यांनी प्रगती साधली होती.गृहनिर्माण क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता..सोमाटणे येथील विविध सामाजिक,राजकीय व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.
त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले,सुना,नातवंडे,भाऊ,बहिणी,
पुतणे असा मोठा परिवार आहे..माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा माळी ह्या त्यांच्या पत्नी तर उद्योजक राजू माळी हे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!