कामशेत :
बौर जवळील वेंकीज कंपनीमध्ये १६१ कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शासनाच्या आदेशानुसार कंपनी प्रशासनाने (दि.१२/०४/२१) ३७५ कामगारांची आरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट खाजगी लॅब मध्ये करण्यात आली  होती. 
शुक्रवारी व शनिवारी (दि.१६ व दि. १७) पर्यंत १६१ कामगारांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. संदीप मुंडे, आरोग्य सेवक केतन जाधव, आरोग्य सेविका विना धुरंधर, आशा सेविका लता वाळुंजकर आदींच्या पथकाने या १६१ कामगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्यांना गृह विलगकरण करण्यात आले.
मास्क व सॅनिटायझर वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा टाळा आदी सूचना दिल्या. ३७५ पैकी आतापर्यंत १६१ कामगारांचा अहवाल आला असुन आणखी कोणत्या कामगारांचा अहवाल येतो का याची प्रतीक्षा असुन सद्यस्थितीत टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची स्थिती चांगली आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!