
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात जास्तीत कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.
आपले राष्ट्र आहे संकटात आहे, कोरोना बाधीत रूग्णांना रक्ताची गरज आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे.कोरोना बाधितांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठला आहे.निष्पाप बळी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे.अहोरात्र झुंजणाऱ्या आरोग्य
सेवेवर याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळेच देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण साऱ्यांनी जागरुकतेने या कोरोना विरुध्दच्या लढाईत सहभागी होऊ या. आणि बहुसंख्येने रक्तदान करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. प्रत्येक ३ महिन्यांच्या अंतराने आपण रक्तदान करु शकतो असेही राष्ट्रवादी काँग्रेसने सुचवले आहे.
प्रत्येक रक्तदात्यास आमदार सुनिल शेळके
यांच्या वतीने टी शर्ट, मास्क, सॅनिटाईझर भेट देण्यात येईल.शासकीय विश्रामगृह शेजारी, पंचायत समिती चौक, वडगाव मावळ येथे गुरुवार दि. २२/०४/२०२१ रोजी सकाळी १० ते २ पर्यंत रक्तदान करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी ९८२२०४२४८४ क्रमांकावर संपर्क साधता येईल.
रक्तदान शिबीरासाठी गरवारे रक्त केंद्र (MIMER)
वैद्यकीय महादिद्यालय तळेगाव दाभाडे यांचे विशेष सहकार्य आहे.