कामशेत:
खांडशी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
सरपंच नवनाथ राणे,उपसरपंच रामदास शिरसट, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई वाघमारे, तुकाराम कुंभार,रवि शिरसट, संदिप भवारी, सचिन गायकवाड, सचिन राणे,किरण भ राणे,संभाजी भवारी, प्रकाश राणे, वैभव राणे, मारुती राणे, सोमनाथ राणे, गौरव राणे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच नवनाथ राणे म्हणाले,
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमित हात धुवा,मास्क लावा, सॅनिटायझरचा वारंवार वापर करा, स्वच्छता राखा,वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते कडे लक्ष द्या.
पोलीस पाटील शिवराम शिंदे म्हणाले,”
विनाकारण घराबाहेर पडू नका,सकस आहार घ्या,भरपूर पाणी प्या,नियमित व्यायाम करा,योगासने,प्राणायाम करा.
गावपातळीवर नागरिक कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत,शासनाने संचारबंदी केली आहे. वीकेंडला लाॅकडाऊन आहे,तरीही पोलीस प्रशासनाची नजर चुकवून अनेक वाहने ग्रामीण भागातील रस्तावर कसे धावतात याकडे गावक-यांनी लक्ष वेधले.

error: Content is protected !!