टाकवे बुद्रुक:
गाव पातळीवरील सर्वागीण विकासासाठी शासनस्तरावर अत्यंत विधायक योजना राबवल्या जात आहेत,याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असा विश्वास डाहूली ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य बळिराम वाडेकर यांनी दिला .
वहानगाव येथे बाळंतविडा कीटचे वाटप करण्यात आले.
ग्रा.प.सदस्य श्री बळीराम रामदास वाडेकर,सौ.जना दिगंबर कुडे उपस्थित ह यांच्या हस्ते ‘बाळातंविडा’ किट वाटप करण्यात आले..
प्रशासकीय अधिकारी आणि अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शासनस्तरावरून गरोदर माता,स्तनदा माता, कुपोषित बालक,शून्य ते सहा वयोगटातील बालक यांच्या साठी सकस आहार पुरवला जातो.
याच धर्तीवर बाळंतविडा ही योजना सुरू आहे,पूर्वी पार पासून बाळ जन्माला आल्यावर पाचवी,बारावी हे धार्मिक विधी पार पडले की,बाळंतविडा घेऊन जाण्याची रीत होती,याच रीतीला अनुसरून शासनाने ही योजना सुरू केली आहे.
शासनस्तरावरून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहे,या योजना गावपातळीवर राबविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी मावळमित्रशी बोलताना दिला

error: Content is protected !!