तळेगाव दाभाडे:
धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था गेली २० वर्ष तळेगाव दाभाडे येथे कार्यरत असून,पंधरा दिवसापूर्वी बनेश्वर विद्युतदाहिनी मधील गॅस संपल्यामुळे कोरोना बाधित मृतदेह अर्धवट जळल्याचे स्थानिक वृत्तवाहिनी
निदर्शनास आणून दिले होते.
या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व सामाजिक बांधिलकी म्हणून, व तळेगाव शहराची गरज लक्षात घेता,पतसंस्थेचे संस्थापक श्री.खंडूजी टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेतर्फे बनेश्वर स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीसाठी वीस गॅस सिलेंडर देण्याचे पत्र तळेगांव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सौ.शिंदे मॅडम यांचेकडे सुपूर्त केले.
संस्थापक श्री.खंडूजी टकले, अध्यक्ष विजय शेटे व सचिव विनोद टकले.तसेच या वीस सिलेंडर ची रक्कम तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये चेक स्वरूपात चेक क्र.१३९३२९ (जनता सहकारी बँक ) देण्यात आलेली आहे.असे सामाजिक उपक्रम पतसंस्था सतत वीस वर्षे राबवित आहे.

error: Content is protected !!