वडगाव मावळ:
विश्ववंदनीय भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाला आचरणात आणणे गरजचे आहे.
त्यांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी तळागाळातील जनसमूहाच्या हितासाठी सतत राबण्याची गरज आहे. त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची उर्मी त्यांच्याच त्यागातून मिळते, असे मत मावळ तालुका राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले, नवलाखउंब्रेतील उद्योजक नवनाथ पडवळ, आंबळेचे सरपंच मोहन घोलप, निगडेचे माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंदर मावळ व नाणे मावळातील बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती असलेली प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना शिवाजीराव असवले बोलत होते.
यावेळी सरपंच पांडुरंग कोयते, उद्योजक विशाल पडवळ, सागर पडवळ, पोलीस पाटील दत्तात्रय बेल्हेकर, प्रविण साळवे, अजय वंजारी, संतोष भागवत, रूपेश घोजगे, संदीप गायकवाड, संतोष पवार, किसनराव ननवरे,सुरेश वाघमारे, रणदिवे गुरूजी, कांबळे गुरूजी, नाथाभाऊ गायकवाड, राजू आंद्रे, बबूशा भांगरे, गणेश भांगरे,अनिल जाधव, उपसरपंच तुळशीराम जाधव,नारायण जाधव,
उपस्थितीत होते.
असवले, पडवळ, घोलप, भागवत यांनी सुदुंबरे , सुदवडी, वराळे, नाणोली, नवलाखउंब्रे, मंगरूळ, निगडे, भोयरे, टाकवे बुद्रुक, घोणशेत, नाणे,कांब्रे, करंजगाव, उकसान येथील बुद्ध विहारात जाऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन प्रतिमा भेट दिली.
बुद्धविहाराच्या नूतनीकरणासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी दिला.
उद्योजक नवनाथ पडवळ म्हणाले, संविधानाने आपला राज्य कारभार चालतो,या संविधानाचे आपण पाईक आहोत,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायक आहेत.
माजी उपसरपंच भिकाजी भागवत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले,बॅरिस्टर झाले,आपल्या घटना समितीचे ते अध्यक्ष होते,सखोल अभ्यास करून त्यांनी लिहिलेले संविधान आपले श्रद्धास्थान आहे.
सरपंच मोहन घोलप म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपले श्रद्धास्थान आहे, जगाच्या पाठीवर सर्वात अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्धीच्या जोरावर त्यांनी लिहिलेली घटना आपल्या साठी लाख मोलाची देणगी आहे.

error: Content is protected !!