कामशेत:
कांब्रे(ना.मा)येथील समतानगरमध्ये मध्ये अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साधेपणाने पार पडला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करीत संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांस प्रामुख्याने कांब्रे गावाचे आदर्श शिक्षक एल. आर. कांबळे गुरुजी व नि. तु. रणदिवे गुरुजी यांनी उपस्थित नागरिकांना महापुरुषांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास आयु.बाळासाहेब रणदिवे(समता सैनिक दल), आयु. अशोक कांबळे(ऊद्योजक), आयु. संजय कांबळे, आयु. राजु कांबळे, आयु. कुंदन वाघमारे, आयु.स्वप्निल रणदिवे. वैभव रणदिवे, आयु. विनोद गायकवाड, आयु. मिलिंद रणदिवे. आयु. प्रतिक कांबळे व गावातील महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!