
वडगाव मावळ:
मागच्या वर्षी कोरोनाचे महासंकट आले,आणि आमची शाळा बंद झाली. आता आम्ही ऑनलाईन शिकतोय,ते नावालाच. शाळेत आम्हाला येता येत नाही,की दंगामस्ती करता येत.
मॅडम ला सरांना भेटायचे ते,फोनवरून कधी शाळेत गेलो की होती आमची भेट पण पूर्वी सारखी नाही .आज सगळ्याच्या दारापुढे गुढी उभारली,मग आमच्या शाळेच्या दारापुढे का नाही,म्हणून आम्ही आमच्या शाळेत गुढी उभारली.
वाऊंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलामुलींचे हे संभाषण. त्यांनी शाळेत गुढी उभारली. मेसाची काठी आणून तिला स्वच्छ धुवून,तिच्या वर कुंकवाचे ठिपके लावून तिला नटवली. भरजरी साडी चोळी,चाफ्याच्या फुलांची माळ लावली. व-हांडयात आकर्षक रांगोळी काढून ही काठी पाटावर ठेवून तिचो पूजा केली,नेवैद्य दाखवला.
