वडगाव मावळ:
कोरोना मुक्तीच्या संकल्पाने, हिंदू नववर्षाचे स्वागत करू या..यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करू या..
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी,सुरक्षेचे नियम पाळूया,
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊ या…
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी अशा अनेक शुभेच्छा संदेश देत यंदा मावळातील गुढीपाडवा सण साजरा झाला.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, अशा शुभेच्छा देत मावळवासीयांनी गुढीपाडवा साजरा केला.
गतवर्षी कोरोनाच्या संकटात सोडून गेलेल्या आप्तस्वकीय आणि नातेवाईकांच्या आठवणीने दिवसाची सुरुवात झाली.या आठवणींना उजाळा देत उद्याच्या आवाहनाला सामोरे जाण्यासाठी नव्या वर्षाची सुरुवात कोरोना मुक्तीचा संदेश गुढी उभारून दिला. अंगणात सडेरांगोळी काढून गुढी उभारली.
या सगळ्या सणावर कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी होती,शिवाय लाॅकडाऊनची भीतीही. तरी नागरिकांनी सणाचा उत्साह कितीसा कमी होऊ दिला नाही. सोशल मीडियावर कोरोनाची लढाई आपण जिंकू असा संदेश दिला जात होता.
आता हा दुसरा संदेश तसाच
सुरु होत आहे नवीन वर्ष,मनात असू द्या नेहमी हर्ष!येणारा नवीन दिवस करेल,नव्या विचारांना नवा स्पर्श.
दुःख सारे विसरुन जाऊ,सुख देवाच्या चरनी वाहू! स्वप्ने उरलेली या नव्या वर्षी,नव्या नजरेने नव्याने पाहू!
ऐक्याची गुढी उभारू आलेल्या,कोरोना संकटावर एकजुटिने मात करू, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
आरोग्याची गुढी ऊभारू,
विश्वाचे संकट दूर करू.
अशा शुभेच्छांनी मावळात गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!