वडगाव मावळ:
परदेशातील वांग्याची चव तुम्ही अनुभवली नसेल तर आंदर मावळातील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्रात ही चव तुम्हाला अनुभवता येईल अर्थात लाॅकडाऊनच गु-हाळ संपल्यावर.
आंदर मावळातील शिंदे घाटेवाडीत हे कृषी पर्यटन केंद्र आहे, येथे तुम्हाला गाव खेड्यातील जीवनमान अनुभवता येईल. चूलीवर खरपूस भाजलेली तांदळाची,नाचणीची, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खायला मिळेल. झणझणीत मिरचीचा ठेसा, वरण, भात, भाजी हे साध जेवण मिळेलच.
लाल मिरची तील झणझणीत गावरान कोंबडी, बक-याचा रस्सा पण मिळेल. इंद्रायणीचा पोटभर भात. ठोकळवाडी धरणातील चवदार पाण्याने तहानही भागेल. हे वाचून तुमच्या मनात येथे जायचा विचार आला असेल, तर थोड थांबा सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय.
आपली आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. शासनाच्या आदेशाचे पालन करा. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर येथे नक्की या. कान्हे फाटा ते खांडी रस्त्यावर हे ठिकाण आहे. सुंदर निसर्गमय वातावरणात रस्त्यावर ती वडेश्वर गावची छोटीशी शिंदे घाटेवाडी नावाचे गाव आहे. येथील गावकरी मुक्ताई कृषी पर्यटन केंद्राचे मालक दत्ता बबन खांडभोर हे असून ते मुक्ताई केंद्राकडे येणाऱ्या प्रत्येक शहरी पर्यटकाला आपल्या परिसरातील व भागातील माहिती देत असतात.
सुंदर असे धबधबे, डोंगर दरी, मंदिरे व तलाव गावाकडेच परिसर बदल माहिती देत असतात शेती विषयी माहिती व राहण्याची व जेवणाची घरगुती पद्धतीने सोय केली जाते.येथे कृषी पर्यटन केंद्रात लावलेली परदेशातील वांग्याची चव चाखता येईल.स्वतःच्या वावरात पिकलेल्या धान्याचे सुग्रास भोजन,मोठ्या आवडीने आपुलकीने खाऊ घालणारे दत्तामामा यांचे मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र तुम्हाला आवडेल.
मुक्ताई त्याच्या लाडक्या लेकीचे नाव आहे, तिच्या नावाने दोन वर्षापासून सुरू केलेले हे पर्यटन केंद्र प्रसिद्धी पासून दूर असले तरी माऊथ पब्लिसिटी मुळे पिपरी चिंचवड शहरात प्रसिद्ध आहे,येथील अनेक राजकारणी विकेंडला दुपारच्या जेवणाला येथे येत असतात.

error: Content is protected !!