
सोमाटणे: शेलारवाडी ता.मावळ येथे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजेच ‘गुढीपाडवा’ हा उत्साहात साजरा करण्यात आला..विहीर अथवा नदीवरुन बांबू स्वच्छ करुन पारंपारिक पोशाख परिधान करत हा सण साजरा झाला…पुरणपोळी,रांगोळी,
अंगणात शेणाचा सडा,दारात पवित्र गुढी अशा सांस्कृतिक वातावरणात शासकीय नियमांचे पालन करत उत्सव संपन्न झाला…बालचमु गाठी खायला मिळाल्याने आनंदून गेले होते…कौलारु घरे,माडीची घरे तसेच आधुनिक पद्धतींच्या घरांचा समावेश असलेल्या शेलारवाडीत सर्वत्र गुढ्या उभारल्याने वातावरणात प्रसन्नता आली होती..
यावेळी शेलारवाडी येथील युवा उद्योजक सतिश भेगडे म्हणाले,की गुढीपाडवा हा सण हर्षाचा,आनंदाचा असून कोरोनाकाळात हे सण जीवन सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा देतात..सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार माळी यांनी हिंदू धर्माचा नववर्षदिन हा खऱ्या अर्थाने हर्षदिन असल्याचे सांगितले.
