
वडगाव मावळ:
आंदर मावळातील भोयरे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत संपूर्ण गावाचे आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात आले. या उपक्रमाला गावक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत संपूर्ण गावाचे आरोग्य तपासणी सर्वेक्षण करण्यासाठी नागरिक स्वयंपूर्तीने पुढे येत होते.
गावामध्ये एकूण २४० कुटुंब आहेत.सर्वेक्षणामध्ये ईमरसन (मॅजिक बस) या सामाजिक संस्थेने देखील सहभाग घेतला होता. गावचे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य,ग्रामसेवक,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,अंगणवडी कार्यकर्त्या,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.
सरपंच श्री.बळीराम राणु भोईरकर व ग्रामसेविका श्रीमती. प्रमिला मारुती सुळके यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार गावातील एकही कुटुंब वंचित राहणार नाही या पद्धतीने संपूर्ण गावाचे आरोग्य सर्वक्षण करण्यात आले.तसेच वय वर्षे ४५ वरील सर्व व्यक्तींना कोव्हिड लसीकरण बाबत माहिती देण्यात आली.
ही लस ही पूर्णपणे सुरक्षित व मोफत असून ती घेण्यास सर्वांना सूचना देण्यात आल्या.तसेच मास्क लावणे , बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे ,सॅनिटाइझर चा वापर करणे.बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे ,तसेच गरज नसताना कोणीही घराबाहेर न पडणे आशा सूचना सर्वांना देण्यात आल्या.

