पुणे: ९ एप्रिल हा भारतीय सैन्य दलामध्ये “शौर्य दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो कारण याच दिवशी सन १९६५ मध्ये गुजरात रन ऑफ कच्छ येथील सीआरपीएफ च्या सरदार पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला व तो हल्ला सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व्ह पुलिस फोर्स) च्या
छोट्याश्या तुकडीने परतवून लावत ३४ पाकिस्तानी सैनिकांना मृत्युमुखी दिले आणि ४ पाकिस्तानी सैनिक जिवंत पकडले. जमिनीवर लढल्या गेलेल्या युद्धात हे एकमेव असे युद्ध होते कि एका छोट्या तुकडीने एवढा मोठा लढा दिला आणि ४ जिवंत सैनिक पकडले गेले. त्याच प्रमाणे या युद्धात ६ बहादूर सैनिकांना वीर मरण आले.

या त्यांनी केलेल्या धाडसाला आणि बलिदानाला केस न्यू हॉलंड पुणे आणि एन डी आर एफ पुणे यांचेकडून “ग्रीन सॅल्यूट” ठरवण्यात आले आणि ९ एप्रिल २०२१ रोजी सुदुंबरे पुणे येथील एन डी आर एफ कॅम्प मध्ये ११११ देशी झाडांचे वृक्षारोपण करून ग्रीन सलाम देण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.

यावेळी एन डी आर एफ 5 वी बटालियन पुणे चे प्रमुख श्री अनुपम श्रीवास्तव - कमांडेंट यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व हा एनडीआरएफ व आसपासचा एमआयडीसी व गावभाग संपूर्ण परिसर वृक्षारोपण करून हिरवागार करण्याचा व शौर्यवान, परमवीर, धैर्यवान देशसेवा करणाऱ्या जवानांना ग्रीन सल्युट देण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी एन डी आर एफ बद्दलची सविस्तर माहिती श्री कुमार राघवेंद्र, असिस्टेंट कमांडेंट यांनी दिली.ग्रीन सलाम या कार्यक्रम मध्ये एन डी आर एफ पुणे येथे ५००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल असे केस न्यू हॉलंड पुणे यांचे संपर्क अधिकारी श्री शंकर साळुंखे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास एन डी आर एफ चे श्री पवन गौड़, डिप्टी कमांडेंट, श्री दीपक तिवारी, डिप्टी कमांडेंट, श्री अनिल तालकोत्रा, डिप्टी कमांडेंट, , श्री सारंग कुर्वे, असिस्टेंट कमांडेंट, श्री शिव कुमार, असिस्टेंट कमांडेंट, श्री कर्मवीर, असिस्टेंट कमांडेंट तर केस न्यू हॉलंड पुणे चे श्रीमती शीतल साळुंके – मानवी संसाधन विभाग प्रमुख, श्री पवन उप्पल – उत्पादन अधिकारी, श्री प्रशांत बेलवटे – मानवी संसाधन अधिकारी तसेच स्पॅक ऑटोमोटिव्ह चाकण चे एच आर ऑफिसर श्री ऋषिकेश दमाने व 5 वी बटालियन, बी 13, व ए/15 वी वाहिनी एनडीआरएफ चे सर्व अधिनस्थ अधिकारी, जवान हे हि उपस्थित होते. हा मुहूर्त साधून शौर्य दिनाच्या दिवशी सर्वांनी विविध वृक्षाचे वृक्षारोपण उत्सव साजरा केला.

सदर कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी एन डी आर एफ चे श्री राजेंद्र पाटील – इन्स्पेक्टर, श्री पुरषोत्तम सींग, इंस्पेक्टर, श्री ईश्वर मते, पीएसआई, श्री अनंत बाबूलकर, पीएसआई, तर निसर्गमित्र श्री धनंजय शेडबाळे, वनराई पुणे आणि श्री माणिक व राहुल – निसर्ग राजा मित्र जीवांचे यांनी सदर झाडे दिलेबद्दल दोन्ही संस्थांकडून विषेश आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!