
वडगाव मावळ:
गुढीपाडवा आनंदाचा उत्साहचा आणि मांगल्याचा सण,या सणाला दारोदारी गुढी उभारून नववर्षाच्या स्वागताची पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेली परंपरा आहे..बांबूची म्हणा नाहीतर मेसाची ही काठी दारापुढे लावून,उभारलेली गुढी नव्या वर्षाच्या स्वागतार्ह असली तरी ही गुढी उभारण्यात पौराणिक दाखले देत आख्यायिका सांगितल्या जात आहेत.
गुढीच्या पूर्वेलाच खेडोपाडी बांबूची काठी तोडून घरी आणली जाते,आज दिवसभर अनेक गावातून गावकऱ्यांनी ही काठी तोडून घरी आणली. बांबूची लागवड जाणीवपूर्वक केली जात नाही. आपसूक पणे उगवलेल्या बांबूच्या बेटातून काठी तोडून घरी आणले जात होते.
या बांबूची बेटे खेडोपाडी बहुतेक ठिकाणी असल्याने शहरातील नातेवाईक खेडोपाडी सोयरेधाय-यांकडे जावून गुढीसाठी काठी घेऊन जाताना दिसत होते.खर तर गुढीच्या दिवशी लागणारी ही मेसाची काठी बाराही महिने वेगवेगळ्या कामासाठी उपयुक्त ठरते.शेतक-यांनी बाबूची शेती करावी म्हणून कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजचे आहे आणि शेतक-यांनी त्याचे अनुकरण करणे गरजचे आहे.
