कामशेत: नाणे मावळातील करंजगाव येथे एका २८ वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. किशोर सुरेश तंबोरे (वय २८ वर्ष रा .करंजगाव ता. मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
त्याचा मोठा भाऊ पप्पु सुरेश तंबोरे (वय ३२ , रा. करंजगाव ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणे मावळातील करंजगावच्या  हद्दीतील, पमाजी चिंधु खराडे यांच्या शेता लगत, मोरमारवाडी ते करंजगाव रस्त्याच्या साईड पट्टीवर आज रविवारी पहाटेच्या सुमारास हा खून झाला.   अज्ञात व्यक्तीने  किशोर सुरेश तंबोरे (वय २८, रा. करंजगाव)  याच्या तोंडावर, डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करून त्यास ठार मारले आहे. हत्येचे कारण समजले नाही याबाबत कामशेत पोलीस अधिक तपास करत आहेत. किशोर च्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ,पत्नी,दोन लहान मुले असा परिवार आहे.

error: Content is protected !!