
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील सुमारे पन्नास गावांना जोडणा-या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन कान्हे येथे झाले.
आदर मावळातील वाढत्या पर्यटनासाठी तसेच औद्योगिकरणामुळे कान्हे टाकवे वडेश्वर रस्त्यावर कायमच वाहतूक कोडी होत असते. त्यामुळे वाहतुकीस अनेकदा अडथळा होत असतो. या रस्त्यावरील रुंदीकरणामुळे वाहतूक कोडीची समस्या सुटणार आहे.
यामुळे या परिसरातील औद्योगिक वसाहतीला तसेच पर्यटनाला अधिक चालना मिळणार असल्याचे राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले यांनी सांगितले.
या रस्त्याचे ७ मीटर इतके रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटरच्या साईड पट्ट्या करण्यात होणार आहे. त्यामुळे टाकवे येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होईल. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १० मिटर रुंद रस्ता करण्यात येणार आहे.
या रस्त्यातील ३ मोऱ्यांचे रुंदीकरण होणार अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी दिली.
कान्हेचे सरपंच विजय सातकर, टाकवेचे सरपंच भूषण असवले,जिल्हा सरचिटणीस बाबाजी गायकवाड, उद्योजक अनिल मालपोटे, डाहूलीचे सरपंच नामदेव शेलार, मा. कार्याध्यक्ष शिवाजी असवले,माजी संचालक अकुंश आंबेकर , माजी उपसरपंच गिरीष सातकर, उपसरपंच संतु दगडे, राजू शिंदे कॉन्ट्रॅक्टर मोहनलाल मथराणी उपस्थित होते.



