नारायणगाव :
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत’ अँग्रो अँबुलन्स कृषी विषयक जनजागृती उपाय’ या अॅब्युलन्स गाडीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, कृषि व पशुसंवर्धनचे सभापतीबाबुराव वायकर,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे,जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख अनिल मेहेर,मुख्य शास्त्रज्ञ-शेटे सर,पशुधन अधिकारी डॉ.शिवाजी विधाटे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव,जुन्नर या ठिकाणी माती व पाणी परिक्षण साठी नवीन गाडी व आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहे.
मावळ,मुळशी,खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या बांधावर ऍग्रो अक या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा चा फायदा होईल. किड व रोगांच्या व्यवस्थापन बाबतीत वेळीच अभ्यास करून उपाय करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शास्त्रज्ञांकडे शिफारस करतील व नुकसान कारक कीड ओळख करून दिली जाईल तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
कीड व रोग यांच्या वर पर्यावरण पूरक उपाययोजना पध्दत सुचवली जाईल तसेच दर वर्षी मे जून मध्ये कृषी विधान केंद्र मार्फत जनजागृती कार्यक्रम राबविले जातात,त्या मध्ये या सर्व बाबीचे शेतकय्रांना माहिती देऊन योग्य त्या खबरदारी उपाय केले जातील.
याचा संपूर्ण फायदामावळ,मुळशी,खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर* या तालुक्यातील कष्टकरी तसेच शेतीत सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या बळीराजाला होईल अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.

error: Content is protected !!