वडगाव मावळ:
कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चैन ही कन्सेप्ट पुढे आणली आहे. याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लाॅकडाऊन घोषित केला. त्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आज शनिवारी ता.१०ला विरळ वाहतुक होती.
या रस्त्यावर दररोज धावणा-या वाहनाच्या तुलनेत आजची वाहतुक विरळच होती. नेहमी प्रमाणे भरधाव वेगातील अलिशान कार फारशा धावताना दिसल्या नाहीत. कार,टेम्पो,ट्रक,बससे कमी प्रमाणात धावताना दिसल्या. काही महत्वाच्या वाहनातून वाहतुक सुरू असली तरी रोजच्या इतकी वर्दळ नव्हती. याचा प्रत्यय उर्से टोलनाक्यावर पाहयला मिळाला.
जशी एक्स्प्रेस वे वर फारशी वर्दळ नव्हती तशी पुणे मुंबई महामार्गावर ही वाहतूक रोजच्या तुलनेत घटलेली होती. नागरिकांनी शासनाच्या या आदेशाचे स्वयंपूर्तीने पालन केले आहे.
ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील बंदोबस्त ठेवला होता,विनाकारण गावभर भटकले की पोलीस कारवाई होते,याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचल्यावर नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले. जनतेच्या मनात कोरोनाची भीती वाढली ही वस्तुस्थिती आहे, लसीकरणाचा तुटवडा आहे,कोरोनाचे इंजेक्शनचा मिळत नाही. हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाही. ऑक्सिजनची कमतरता,प्लाझ्मा मिळत नाही,रक्त तुटवडा आहे.
या ना अशा अनेक बाबींची चर्चा सर्वसामान्य जनतेस प्रसार माध्यमातून पोहचत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील खबरदारी घेऊ लागले आहे. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाची चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शासन आपल्या परीने सगळे उपाय योजना करीत असताना आमची काही तरी जबाबदारी आहे,या भावनेतून ब्रेक द चैन ही कन्सेप्ट बळावत आहे.
नागरिक वीकेंड ला घर सोडीत नाहीत, घरी थांबून वर्क फार्म होमवर भर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम,सकस आहार,प्राणायाम,योगासने करण्यावर भर दिला जात आहे. गरमागरम काढा पिण्यावर,फळे खाण्यावर भर दिला जात आहे. जान है तो जहान है! अस मानून प्रत्येक जण आपली काळजी घेत आहेत. वीकेंड ला रस्त्यावर वाहने आढळली नसली तर वीकेंड पूर्वी शुक्रवारच्या पूर्वेला मावळातील धरणाकाठच्या फाॅर्म हाऊसेस मध्ये पुणे मुंबई शहरातील कित्येक वाहने आली असल्याचे गावकरी सांगत आहेत.
विशेषतः वाडिवळे धरणाच्या परिसरात अशा अनेक वाहनांचा ताफा गेला असल्याचे स्थानिक गावकरी सांगत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने होणा-या मृत्यूच्या घटना काळजाला भिडत आहे
कोरोनाने जाणे हे त्या कुटुंबातील सर्वाना खूपच दु:खदायक आहे. दुश्मनावर अशी वेळ येऊ नये, अशी हळहळ व्यक्त केले जात असले तरी या महामारीतून आपण बाहेर पडू शकतो असा विश्वास आरोग्य यंत्रणा देत आहे.
ब्रेक द चैन या मिनी लाॅकडाऊन सह लसीकरणचा वेग वाढवला जावा, कोरोनाचे इंजेक्शन मिळावे, ऑक्सिजन बेड या सुविधा मिळाव्यात अशीही चर्चा सुरू आहे. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केल्यास या संकटातून आपण बाहेर पडू, त्यासाठी शासनाच्या आदेशाचे पालन गरजेचे आहे. सतत हात धुवा, गरजे शिवाय घराबाहेर पडू नका, गर्दीत मिसळू नका, सॅनिटायझर वापरा, रस्त्यावर थुंकू नका, स्वच्छता राखा, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला महत्व द्या.
भरपूर पाणी प्या, सकस आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या, व्यायाम करा अशा एक ना अनेक सूचना प्रत्येक जण करीत आहेत.

error: Content is protected !!