कामशेत,ता.१०:
पन्नास पेक्षा अधिक व-हाडी जमवून साखरपुडा करणे वधूवरांच्या नातेवाईकांना महागात पडले आहे. त्यांच्यासह कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगावच्या गुरुदत्त मंगल कार्यालयात शासनाच्या नियमांचेउल्लंघन करत, कोणतीही पूर्वपरवानगी न
घेता पन्नास पेक्षा जास्त व-हाडी जमवून साखरपुडा केल्या प्रकरणी वधुवराच्या कुटूंबातील दोघांवर व मंगल
कार्यालयाच्या मालकावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप रामचंद्र बालगुडे (वय ५०, रा. पाथरगाव), अंकुश
खंडु तोंडे ( रा. पाथरगाव), दादासाहेब दत्तात्रय लालगुडे
(वय ३४, रा. नायगाव) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार
(ता..८) ला दिलीप बालगुडे व अंकुश तोंडे यांची मुलगी
व मुलगा यांचा साखरपुडा समारंभाचे नायगाव येथील
गुरुदत्त गार्डन मंगल कार्यालयात आयोजन करण्यात
आला होता.
या साखरपुड्याला कोणतीही कायदेशीर
परवानगी न घेता शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून
पन्नास पेक्षा जास्त लोकांची गर्दी कार्यालयात जमवली
होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर
अशा कोणत्याही नियमांचे पालन केले नव्हते. यामुळे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने
कामशेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी करून
आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!