तळेगाव दाभाडे:
तो सांगवडे गावचा तरूण शेतकरी,घरची शेती पिढ्याजात हाच त्याचा मुख्य व्यवसाय. शेतीतील वाढते यांत्रिकीकरण पाहून त्याने याच क्षेत्रात करियर करायचे ठरवले. उद्योजक योगेश संजय राक्षे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव.
त्याने कमी वयात ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेऊन घरची शेती करून सांगवडे गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सहकार्य करतो .त्यांचे वडील संजय दिमाक राक्षे व भाऊ गणेश संजय राक्षे , चुलते ज्ञानेश्वर दीमक राक्षे सगळ्यांची त्याला कायम प्रोत्साहन असते.
घरातील शेतीची सगळी कामे तो करतो,त्याच बरोबर त्याला मदत मागायला कोणी आले तर त्याचा हात मदतीसाठी सदैव पुढचे असतो .
यांत्रिकीकरण करून शेती केली की,वेळेचे ही बचत होते आणि श्रमही वाचते. या शिवाय उत्पन्न वाढीला ही मदत होते. शेतकऱ्याच्या लेकाने शेतात राबलेच पाहिजे असे त्याच मत आहे.

error: Content is protected !!