टाकवे बुद्रुक: कान्हे फाटा मुख्य रस्ता दिवसेन दिवस बनत चालेले आहे अपघाती क्षेत्र.कामाच्या लकबगित येताना आज सकाळी 7 वाजता टाकवे बु. येथील औद्योगिक वसाहत या ठिकाणी कायनेटिक व गेस्ट स्टॅम्प कंपनी समोर 2 व्हिलरचा समोरासमोर अपघात झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कामगारांच्या गाड्या पार्किंग व कंपनीने साईट पट्यावर टाकलेल्या दगड मातीमुळे तेथील रस्ता अरुंद झाला. ङरस्त्यावरती कोंडी होत असल्याने वळणावरती अंदाज येणे अवघड होत आहे, या अपघातामध्ये आंदर मावळ मधील कूसवली या गावातील कामगार कंपनीमध्ये कामाला जात असताना सोपान चिमटे व त्याची बायको व दुसऱ्या टू व्हीलर वरील एक युवक जखमी झाले. तरी चिमटे कुंटूबा वरती टाकवे येथील पवार हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
टाकवे मुख्य रस्त्याला लागून मोठ्या कंपन्या आहेत. परंतु यामधील काही कंपन्यांचे पार्किंगचे कसलेही नियोजन नाही, कंपनीत येणारे कामगार,कंपनीसाठी बाहेरुन येणारा रॉ मटेरियलचे कंटेनर त्यामुळे रस्त्यावरती दोन्ही बाजूने कोंडी होत असून, या रस्त्यावरती छोटे-मोठे नेहमी अपघात होत असतात या अपघाताची दखल कुठेही घेतली जात नाही. तरी सर्व कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कंपनीत कामाला येणाऱ्या कामगारांच्या गाड्या व रॉ मटेरियलच्या येणाऱ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था कंपनीच्या गेटच्या आत मध्ये करावी. गाड्या रामभरोसे रस्त्यात्याच्या बाजूला सोडून पार्किंग करू नये. गाड्या पार्किंगमुळे रस्ता कोंडी होत आहे जीवितहानी झाल्यास सदर कंपनी वरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या स्वरूपाचे निवेदन सेवा फाउंडेशन कडून सर्व कंपन्या व्यवस्थापन, ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक, पोलीस स्टेशन वडगाव मावळ याठिकाणी देण्यात येणार आहे. अशी माहिती सेवा फाउंडेशन अध्यक्ष , संदीप मालपोटे, किरण भांगरे, राघू मोरमारे, अनिल जाधव, ज्ञानेश्वर ढोरे, तानाजी मोरे यांनी दिली.तसेच या निवेदनाचा विचार न केल्यास येत्या 15 दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवा फाउंडेशन या सेवा भावी संस्थेने दिला आहे.

error: Content is protected !!