तो कळकराईचा..मुंबईत नोकरी करतो..मागच्या वर्षी लाॅकडाऊन पडल आणि तो गावी आला. तीन महिने बायको पोरात राहिला. आई वडिलांची सेवा केली. डोक्यावर थोडस कर्ज आहे, गाडीचा हप्ता आणि कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा म्हणून तो तीन महिने दहा दिवसांनी पुन्हा नोकरीला निघाला..त्याने आवराआवर केली होती ..तो निघाला..पुढ काय त्याच्या तोंडून ऐकू..
मी कळकराईचा चद्रकांत कावळे..
मी घरामधून कामास निघण्यास १० मिनीट असतिल तेव्हा.माझी बैग मी भरली ,मला थोडी मदत देखील माझ्या बायकोने अंकी ने केली. माझे सर्व साहित्य कपडे मी भरले. माझे कागदपत्रे मेडीसींन पण मी भरले माझे प्यकेट पण मी चेक करुन बैगेत टाकले.
लॉकडाऊन च्या काळात बैचारीला ३ महिने १० दिवस मी घरी असल्याने तिला खुप छान वाटले होते… कमतरता होती ती फक्त आम्हाला पैशाची म्हणून मला कामाला यावे लागले.मी ज्या दिवशी कामाला निघणार होतो तो दिवस बैचारिला वाटला असेल येऊ नये म्हणून.. मी निघणार असल्याने ती सारखी बाजुला जाऊन रडायची.
मी गप्चुप पाहात बसत होतो , मध्ये मध्ये माझ्याही डोळ्यात अश्रु यायचे पण तिला गप्प म्हनायला माझी हिम्मत नाही व्हायची. तिला खुप वाईट वाटले असेल की आता माझा नवरा कामाला जातायत तर कधि येतिल. किती दिवस कामावर राहतील.
कसे राहतील..वरुन कोरोनाचे संकट तर आजुन तिच्या मनात वेगवेगळे विच्यार.असतिल ते अठऊण रडत बसायची.माझी काही शुल्लक कारनास्तव तिच्याशी वादावाद व्हायची पण तिने असे कधि मनाला लाऊन घेतले नाही.
आणि कधि बोलली ही नाही.पण हे शेवटचे 10 मिनीटं.
मी तिला विच्यारले तुझ्याकडे किती पैसे आहेत…तुला खर्चायला मुलिन्ना खाऊ खायला पैसे देऊ का ?
असतिल तर सांग मला आणि नसतील तरी सांग मी काही पैसे तुला ठेवतो .आणि atm तुलाच ठेव किराणा तर पुर्ण आहे आपला.
मी atm मध्ये पैसे टाकेल मग तू तूझ्या दिरान्ना सांग की पैसे काढून घेउन या असे.मी तेवढे बोलुन कामाला दुपारच्या सुमारास निघालो.माझ्या प्यकेट मध्ये वरती २०० रु होते फक्त.. त्यच्या चैन मधे ५९ रु चिल्लर असेल १० चे ५ चे कॉइन आणि माझ्या मोबाईल कवर मध्ये १०० रु होते.तिने हे मला न कळता कधि प्यकेट चेक केले मोबाइल चेक केला मलाही माहिती नाही.तिला माझ्या प्यकेट च्या आता मध्ये १००० रु होते ,हे माहिती नसावे कदाचित.
मला तिने विच्यारले किती पैसे आहेत तुमच्याकडे.. तुम्हाला जायला.काही वस्तू घ्यायला पैसे किती आहेत… मी बोललो की १००० \१२००च्या वरती आहेत तेवडे मला खुप होतिल म्हणून तुम्हाला पाहिजेत तर यातले ठेव. मग मी आजुन पाठवतो atm मध्ये असे बोलुन मी घरामधून बाहेर पडलो.
माझ्या सर्व नातेवाईकांना बोलुन भेटून आईशी बोलुन मी कामावर निघालो.आई सुद्दा बोलली तुला पैसे आहेत का कामाला जायला… माझ्याकडे होते तर मी बोललो आहेत म्हणून मी घराच्या खाली पटांगणात आलो.. माझी बायको अंकी रडायला लागली होती.टीप टीप अश्रु पडत होते ते मला पहावत नव्हते.त्यात माझी छोटी मुलगी अन्वी पाठी लागली होती.
पप्पा मला पण कामाला यायचय तुमच्या सोबत तिचे रडणे , मी खुप लांब गेलो तरी मला आइकायला येत होते.सर्व माझे नातेवाईक आणि मामा तिला समजावत होते. आणि त्यात माझी बायको सुद्दा रडत होती.
कदाचित त्यांना माझ्या नातेवाईकांना खुप वाईट वाटले असावे.. कारण मी ३ महिने १० दिवस घरी होतो. आता कामाला जातोय म्हण्जे किती दिवस कामावर राहिल याची कल्पना कोणाला नाही. त्यात मी सर्वांशी खुप प्रेमाने वागत होतो सर्वांशी गप्पा गोष्टी करत होतो. म्हणून मलाही गाव सोडाव वाटत नवते .
पण माझे गाडीचे emi चालू आहेत .आणि थोडासा कर्ज अंगावर असल्याने मला कामाला यावे लागले.
असे अस्ता मी घर सोडून बाहेर पडलो खाली जाधव वाडी मध्ये माझ्या नवीन साडूण्णा ,मी कॉल करुन बोलावले मला कामाला जायचय घ्यायला. या ते ही मी पोहचतात तिथे आले.मला उपवास आहे हे माहिती त्यांना होते.आणि मेहुनिला देखील माहिती असते की भाऊजिंचा फिक्स मंगळवार उपवास असतो ते..
आम्ही दोघे निघालो.कर्जत ला पोहचलो .
आणि माझ्या मित्राला देवेंद्रला सांगितले की मी कर्जत मध्ये पोहचलोय मला घ्यायला यावे लागेल.नाहितर मी बस ने येतो.त्याने माझ्या कामावर्च्या मालकिनिला म्हण्जेच आमच्या म्याडम ला मी कर्जत ला पोहचलोय ते सांगितले देवेंद्र म्हणाला की चंद्रकांत बस ने येतो म्हणाला. तर म्याडम लगेच बोलल्या आपली इनोवा घेउन जा आणि चंद्रकांतला सुखरुप टॉवर ला घेउन ये तो निसर्गाच्या फ्रेश वातावरणामधून येतोय त्याला काही होता ,कामा नये तेवढ्यात मित्राने म्हणजेच देवेंद्रने मला कॉल केला गाडी येते तू कुठे जाऊ नको मी बोललो ठिक आहे..मी त्याला लोकशन पाठवले.
मला खुप भूख लागली होती. मेहुनीने माझ्यासाठी स्पेशल साबुदण्याचे वडे आणि तिखट नारळाची चटनी बनवली होती.मी ७ \८ वडे तर खाल्ले असावे.
आणि माझ्या बायकोने आंकि ने मेहुनी आणि साडूंसाठी, जंगलातील लौतीची भाजी, कूर्ढू ची भाजी आणि माठाची भाजी दिलेली होती ती मी त्यानां बैगेमधूण काढून दिली.मेहुनी आणि त्यांच्या घरातले फ्रेश भाजी पाहुन खुष झाले
त्यात माझी मोठी मुलगी देखील तिथेच होती.तिच्या मावशी काकांसोबत पाहुनी आली होती.त्यात माझी मोठी मुलगी ती पण तिच्या मम्मी सारखी रडायला लागली होती .आणि माझी मेहुनी सुद्दा नविन लग्न झाले १५ दिवस उलटले होते फक्त लग्नाला ,त्या मुळे मेहुनिला देखील वाईट वाटले होते.
माझ्या मोठ्या मुलीला समजावत तेवढ्यात इनोवा गाडी पोहचली आणि मी सर्वांना टाटा बाय बाय करुन निघणार तर…साडू बोलले त्यांना बोलवा मग तेवढ्यात माझा मित्र किरण टॉवर मधुन जेवन करुन आलेला होता. मी त्यांना ईकडे या असे बोललो २ वडे खा, असे माझे साडू बोलले पण ते नाही ,म्हणाले मग मेहुनीने गरम गरम डब्यात पार्सल दिले. आणि आम्ही गाडी कडे निघालो.. माझी मोठी मुलगी ज्यास्तच रडत होती.
आणि माझ्याही डोळ्यात पाणी येत होते .मी किरण ला म्हणालो चला लवकर एकदाची नाहितर माझी मुलगी खुप रडल.. आम्ही दोघे लगेच निघालो. कामावर पोहचलो एकदाची.मला टॉवर मध्ये आल्यावर आमच्या सिक्योरिटी गार्ड प्रकाश आणि शिंदे मामा ने माझे तापमान चेक केले… मला स्यणीटायझर करुन… सांगितले लवकर जा पहिले गिजर चालू कर आणि चांगले गरम पाण्याचे शावर आन्गावर घे म्हणजे एकदम फ्रेश होशील.. मी देखील तेच केले चांगला फ्रेश झालो आणि मग माझ्या बायकोला आंकि ला आणि साडूंणा कॉल केला मी सुखरुप ७ वाजता टावर ला कामावर पोहचलो
आता मी १ जुलै २०२० तारखे पासुन कामाला जॉईन झालो गेले ६ दीवस मला माझ्या बायकोने किती तरी कॉल sms केले आच्यनक तिने मला पैशाचा विषय काढला.. मला माझी बायको अंकी म्हणाली तुम्ही तुमचे प्यकेट चेक केले का मी म्हणालो हा त्यात किती पैसे आहेत मी म्हणालो ७०० रु वरच्या खाण्यात दिसतात तेवढे आहेत.
कारण माझ्या प्यकेट मध्ये चिल्लर व्यतिरिक्त २०० रु ची नोट होती आणि आतमध्ये लपवलेले एमरर्जंसी १००० रु होते.मला असे वाटले की मी १००० रु मधिल ५०० रु २०० च्या नोटी सोबत ठेवले आहेत.असे ७०० रु आहेत असे बोललो.
मला परत विच्यारले तुमचे प्यकेट परत एकदा चेक करा… तेवढ्यात मी कपाट खोलून ब्यगेमधिल प्यकेट काढूण चेक केले तर… त्या मधे ७]० रु होतेच आणि माझे १००० देखील तसेच होते.. मग मी माझ्या बायकोला आंकि ला सांगितले की या मध्ये ५०० रु एक्स्ट्रा आहेत… तेव्हा ती मला बोलली.तुम्ही कामाला जाताय तुमच्याकडे पगार होईपर्यंत खर्चायला पैसे कमी पडतील या मुळे मी तुम्हाला न बोलता प्यकेट मध्ये पैसे ठेवले होते.
असे ऐकुन माझे मन एकदम सुन्न झाले… काय माझ्या बायकोचे आन्किचे तिच्या नवर्याला म्हणजेच मला खरया आपुलकिची नात्याची प्रेमाची नवराबायकोची जाणिव करत… किती माझ्यावर माझ्या बायकोचे प्रेम आहे हे मला माझ्या लग्नाच्या ८ वर्षात नाही समज्ले ते काल६ तारखेला त्याची खरी जाणिव आणि माझ्या नवर्याची काळजी हे सिद्द करुन दाखवले.असे माझ्या बायकोचे माझ्यावरिल आतुट प्रेम.
हे मला कधि कळलेच नव्हते पण काल मला त्याची जाणिव करुन दिली अक्षरशा माझ्या डोळ्यामधूण अश्रू आले.येवढे प्रेम माझी बायको अंकी माझ्यावर करते.
असेच देव करो निसर्गाच्या सान्निध्यात कोणालाही काही न होता ही शृश्टी कोरोनाच्या संकटातून जात असताना या वर मात करुन माझे कुटुंब..
आणि जगातील असंख्य कुटुंब सुखरुप रहिली पाहिजेत असे प्रार्थना करतो.मी अनुभवलेले क्षण आणि माझ्या बायकोचे माझ्या मुलींचे माझ्या नातेवाईकांचे माझ्या वरिल प्रेम असेच राहिल ही निसर्ग चरणी पुन्हा एकदा प्रार्थना
( शब्दांकन-चंद्रकांत सोभाजी कावळे)

error: Content is protected !!