वडगाव मावळ:
पुणे – मुंबई महामार्गावर मौजे जांभूळगाव फाटा या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे आणि सर्विस रस्ता करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या जांभूळगाव शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.मनसेने रस्ते विकास महामंडळाच्या लोणावळा विभागीय सहाय्यक अभियंताना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे .
या आशयाचे निवेदन देऊन मनसेने म्हटले आहे की,
रविवार दिनांक ४/४/२०२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाभूळ गाव येथील रामदास जांभूळकर व शिवाजी जाभूळकर यांचा जांभूळफाटा येथे दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना अपघात झाला. या अपघातात रामदास जांभूळकर हे घटनास्थळी मयत झाले . शिवाजी जांभूळकर हे दवाखान्यात उपचार घेत आहेत.
वडगाव-कामशेत दरम्यान जांभूळफाटा येथे महामार्गावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे आहेत पण ते स्पष्ट दिसत नाहीत, तसेच याठिकाणी दुभाजकावर वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे तेथे रस्ता ओलांडत असताना नियमित अपघात होत असतात.
जांभूळफाटा परिसरातील रहदारी झपाट्याने वाढत आहे, परंतु तेथे मूलभूत सोई पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यातआलेल्या नाहीत.याकडे मनसेने लक्ष वेधले आहेत.
जांभूळफाटा येथे होणारे अपघात टाळावयाचे असतील तर त्याठिकाणी खालील सुविधा उपलब्ध कराव्यात असे मनसेने सुचवले आहे.
•सिग्नलव्यवस्था कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
•महामार्गावर स्पष्ट दिसतील असे झेब्रा क्रॉसिंग पट्टे असावेत.
•रस्ता क्रॉसिंग साठी दोन रस्त्यांमधील अंतर जास्त असायला हवे.
• कामशेत ते वडगाव सर्विस रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणे.
समस्त जांभूळगाव व परिसरातील ग्रामस्त नागरिकांची वरीलप्रमाणे मागणी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जांभूळ शाखेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या सुविधा लवकरात
लवकर निर्माण कराव्यात अशी विनंती करण्यात येत आहे, अन्यथा जांभूळ आणि परिसरातील नागरिकांच्या
हितासाठी ,सोईसाठी त्याठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, व पुढे होणाऱ्या परिणामास आपण
जबाबदार असाल असा इशारा देण्यात आला आहे.
जांभूळ फाट्यावर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता व वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी जांभूळ मनसे शाखेचे वतीने MSRDC च्या सहाय्यक अभियंतांना जांभूळ फाटा येथे झेब्रा क्रॉसिंग व सर्व्हिस
रोड ,सिग्नल ,अपघात रोधक फलक व उपाय
योजना त्वरित करण्या मागणीचे निवेदन देण्यात आले .

या उपाय योजना त्वरित न केल्यास जांभूळ मनसे व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र रस्ता रोखो आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.या प्रसंगी
जांभूळ शाखेचे अध्यक्ष नवनाथ जांभूळकर,
स्वप्निल राऊत, बाळासाहेब गराडे, सोमनाथ जांभूळकर,जय शिंदे, कैलास गराडे व अनेक
मनसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!