तळेगाव दाभाडे:
समाजाचे आपण काही तरी देण लागतो, या भावनेतून केलेली मदत ही नेहमीच अनुकरणीय ठरते, असे मत निगडे च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांनी व्यक्त केले.
निगडेतील युवा उद्योजक श्री.राजेश बाळासाहेब पानसरे
यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भिंतीवरील घड्याळे भेट दिली, यावेळी भांगरे बोलत होत्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. मीराताई भांगरे, मा.चेअरमन दादाभाऊ भांगरे, मा. चेअरमन भिमाजी भांगरे, ग्रामपंचायत सदस्य कु. गणेश मारुती भांगरे,मा. सरपंच सोपान ठाकर, शा.शि.अध्यक्ष साहेबराव भांगरे, दत्तात्रय देशमुख, साहेबराव देशमुख, विलास भांगरे, बाळू काका पुंडले, कैलास असवले आणि शिक्षक उपस्थित होते.
सरपंच सौ. सविताताई भांगरे यांनी राजेश पानसरे यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक ही केले.अजिनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापक मस्तूद मॅडम यांनी आभार मानले.