मुंबई:
धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनाच्या महामारीवर आपण निश्चित मात करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लोकनेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला ह्या अभुतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे असे आवाहन ही पवार साहेबांनी केले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जनतेला केलेल्या आवाहनात शरद पवार साहेब म्हणतात,
कोव्हिड-१९ ह्या जागतिक महामारीची दूसरी लाट संपुर्ण राज्यात पसरली आहे. दिवसोंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे.
राज्यशासन,पोलीस व प्रशासकिय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स,
परिचारीका व संलग्न कर्मचारी रूग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
ह्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. नागरिकांना याद्वारे
आवाहन करण्यात येते की, राज्यशासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या
मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करावे.
गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क आणि
सानिटाईझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सुचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम टाळावेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभुतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा.
त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाआहे. त्याकरीता रक्तदान शिबीरांचे कार्यक्रम देखील हिरहिरीने राबवावेत.
मला खात्री आहे की, आपण धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर
निश्चित मात करू.

error: Content is protected !!