तळेगाव दाभाडे :
सोमाटणे येथील वारकरी संप्रदायाचे शहाजी अण्णा गणपतराव मुहे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रगतीशील शेतकरी अशीही त्यांची ओळख होती.
त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते.
सोमाटणे येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्यात त्यांचा
सिहांचा वाटा होता.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे आरोग्य सभापती किशोर
भेगडे यांचे सासरे, युवा उद्योजक सोमाटणे ग्रामपंचायत
सदस्य राकेश अप्पा मुहे, उद्योजक नरेंद्र मुहे यांचे ते वडील
होत.