मुंबई:
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देशमुख यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करुन १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असा आदेशही न्यायालयाने दिला.
या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याने त्यांनी.राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर लगेच
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माझी सीबीआय चौकशी होणार असून त्याआधी मी राजीनामा.देत आहे, अशी इच्छ पवारांकडे व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाऊन राजीनामा दिला.

error: Content is protected !!