तळेगाव दाभाडे :
जांबवडेच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे (वय ५२) यांचे रविवारी (दि.४) अल्पशा आजाराने निधन झाले. माहेरी आणि सासरी लाभलेला वारकरी संप्रदायातील वसा आणि वारसा त्यांनी संभाळला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, सासरे, दीर,
पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.सन १९९९ पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली व सरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळली.या काळात अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था,
सुधारित पाणी पुरवठा योजना मार्गी लावली. त्यांच्या
पुढाकाराने स्थापन झालेल्या निशिगंधा महिला बचत गटातून महिलांना रोजगार मिळाला.
जांबवडे गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय
दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी, तर उद्योजक मदन
भांगरे, चेतन भांगरे, विक्रांत भांगरे यांच्या त्या
मातोश्री होत. प्रगतिशील शेतकरी नारायण भांगरे,
माजी ग्रामपंचायत सदस्य नथू भांगरे यांच्या त्या सूनबाई होत.