टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ कृषी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आज सोमवार दिनांक ५ एप्रिल रोजी होणारी पर्यटन कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे. आंदर मावळातील तरूणांना कृषी पर्यटन या विषयी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत पर्यटनाविषयी मार्गदर्शन केले जाणार होते.
आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात होते,तर नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी घाडगे साहेब,गटविकास अधिकारी सुधीर भागवत,कृषी अधिकारी देवेंद्र ढगे,आंद्रा धरणाचे सहाय्यक अभियंता अनंता हांडे यांच्यासह बॅकेचे अधिकारी या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार होते.
या व्यवसायात येणा-या तरूणाना मार्गदर्शन मिळावे यासाठी माऊत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्हयातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रम घेता येण शक्य नसल्याने ही कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही कार्यशाळा घेण्यात येईल असे आंदर मावळ कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्षशेखर मालपोटे ,सचिव श्रीकांत चव्हाण व गोपाळ पिगळे यांनी सांगितले.