लोणावळा:
महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान,जागृत देवस्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार समाजाची
कुलस्वामीनी कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे,या बाबतची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश.गायकवाड यांनी दिली.
पुणेचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे..पुणे शहर व पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर.वाढला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी.
जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्याचे आदेश.देण्यात आले आहेत. यानुसार सर्व धार्मिक स्थळे
देखील पुढील सात दिवस अथवा शासनाचा पुढील
आदेश होईपर्यत बंद ठेवण्याच्या सुचना करण्यात
आल्या आहेत. या आदेशानुसार एकविरा देवीच्या
मंदिरात पहाटेचा अभिषेक व आरती पुजाऱ्यांच्या
हस्ते करत मंदिर बंद करण्यात येणार असल्याने
भाविकांनी दर्शनासाठी गडावर येऊ नये असे
आवाहन प्रशासकीय समितीकडून करण्यात आले
आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशांची
अंमलबजावणी करण्यासाठी लोणावळा ग्रामीण
पोलीस स्टेशनच्या वतीने कार्ला फाटा येथून प्रवासी
व भाविकांची वाहने माघारी फिरवत आहेत.

error: Content is protected !!