वडगाव मावळ:
तुमच्या घरी लग्न कार्य असेल,आणि तुम्ही जागरण गोंधळ करण्याच्या विचारात असला तर जरा थांबा, ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागरण गोंधळ कार्यक्रम केल्याने कारवाई करण्यात आली आहे.
या बाबतीत वडगाव मावऴ पोलीस स्टेशन भाग 6 गु र नं 55/2021
भा.द.वि.क.188,269,कोवीड 19 उपाययोजना अधिनियम 2020 चे कलम 11, साथरोग नियंत्रक कायदा 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी-.राम हरी भोसले वय 50 वर्षे, पो हवा ब नं 138 नेमणुक वडगाव मावऴ पोलीस स्टेशन मोबाईल नंबर.9766612722 यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी.विष्णु मारुती असवले रा.टाकवे बु ता.मावळ जि पुणे याने त्यांचे राहते घरा समोर
जिल्हाधिकारी सो पुणे यांचेकडील आदेश क्रमांक आ.व्य/कावी/176/2021 पुणे दिनांक 21/02/2021 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे काढलेल्या आदेशानुसार रात्रीचे संचारबंदी असताना व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असतांना त्या आदेशाचे उल्लंघन करुन आपल्या राहते घरा समोर बेकायदेशीर मांडव टाकुन जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवुन समारंभात प्रमाणापेक्षा व शर्तीपेक्षा जास्त 60 ते 100 लोकांची बेकायदा गर्दी जमवुन सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही ,मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचे उल्लघंन केले आहे.
म्हणुन त्याने महा पोलीस अँक्ट कलम भा.द.वि.क.188,269,कोवीड 19 उपाययोजना अधिनियम 2020 चे कलम 11, साथरोग नियंत्रक कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा केला आहे. म्हणून माझी त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करीता फिर्याद आहे.वगैरे मजकूर चे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!