तळेगाव दाभाडे:
ॲप्टीव्ह कंपनीच्या सामाजिक विकास निधीतून नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये डिजिटल स्कूल योजनेतून पहिली ते आठवी इयत्ते पर्यत टॅब्लेट लायब्ररीची सुरू करण्यात आली आहे.
ॲप्टीव्ह कांम्पोनंटस् ( इं ) प्रा. लि. चाकण, रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे,रोटरी पुणे पाषाण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल दांडेकर, सचिव अनिश होले, प्रोजेक्ट समन्वयक महेश महाजन, प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चव्हाण, धनंजय मथुरे, अतुल हंम्पे, जयवंत देशपांडे उपस्थित होते.
नगराध्यक्ष चित्रा जनागडे यांनी डिजिटल स्कूल संकल्पनेचे कौतुक केले.प्रकल्पांचे प्रमुख बाळासाहेब चव्हाण व प्रकल्प समन्वयक महेश महाजन यांनी आभार मानले.