टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यात कोरोना रोगाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले असून ग्रामीण भागात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सोमवारी (दि.५) रोजी होणारा टाकवे येथील येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी दिली.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून सरासपणे उल्लंघन होत असल्याने या घटनेस टाकवेकरांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी नागरिकांनी शासनाच्या त्रिसूत्री कार्यक्रमाचे पालन करून कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे.
सोमवारी टाकवे येथील आठवडे बाजार भरत असतो.
या आठवडे बाजारामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील भाजी विक्रेते व इतर व्यापार करणारे व्यापारी येत असतात. तसेच खरेदी करण्यासाठी आंदर मावळातील चाळीस गावातील नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोना संक्रमणात वाढ होऊ नये म्हणून (दि.५) रोजी होणारा आठवडे बाजार जिल्हाधिकारीच्या आदेशानुसार स्थगित केला असल्याचे टाकवे ग्रामपंचायतीचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

error: Content is protected !!