वडगाव मावळ:

गेल्या तीन दिवसांपासून शेलारवाडी ता.मावळ येथे वीजेचा लपंडाव सुरु असून वीजेच्या या खेळखंडोबाने सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत…सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोक घराबाहेर जाण्याचे टाळत आहेत..शासकीय नियमांचे पालन करुन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याच्या लोकांच्या प्रयत्नांवर सतत वीज नसणे ही बाब अडथळा ठरत आहे…वारंवार वीज जाणे,एक लाईन नसणे,बराच काळ वीज गायब असणे,डीम लाईट येणे अशा समस्यांमुळे येथील नागरिक हैराण झालेले आहेत…वीजेच्या सतत खंडित पुरवठ्यामुळे बालचमूही निराश झालेले आहेत.

कंपनीमध्ये नाईट ड्यूटी असल्याने दिवसभर वीजेच्या लपंडावाने पुरेशी झोप होत नसून त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याची तक्रार श्री.अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार श्री. सुहास माळी यांनी व्यक्त केली…वीजेच्या लपंडावाने शेलारवाडीकर नागरिक मेटाकुटीला आल्याचे मत श्री.मोहन शेलार यांनी व्यक्त केले…अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीच्या कामात खोळंबा होत असल्याचे मत श्री.गणेश जाधव यांनी व्यक्त केले…लवकरात लवकर वीजेची समस्या दूर व्हावी,अशी अपेक्षा अनेक जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!