पुणे:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियमानुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोग्याच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे सुधारित आदेश काढले आहे,या आदेशाचे पालन करणे सर्वाची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडोल पत्र दिनांक १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू
(कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतूदीच्या
अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड -१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे आपती
व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
ज्याअर्थी, मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग,
मंत्रालय,मुंबई यांचेकडील No.DMU/२०२०/CR PRADHM-2, दि.२९/०६/२०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.
मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली कोव्हीड -19 विषाणूचा.प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेचे अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे मा. खासदार, मा. आमदार मा. महापौर पुणे व प्रशासकीय अधिकारी तसेच इतर मान्यवर यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्याअर्थी, मी डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,पुणे पुणे जिल्हा
ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत लॉकडाऊनच्या मुदतीत कोव्हीड -१९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करीत आहे.
अ) कोव्हीड-१९ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना…..
● पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत
●०३/०४/२०२१ पासून सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र
येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीस रक्कम रु. १०००/-
(प्रति व्यक्ती) याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
●पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत
दि. ०३/०४/२०२१ पासून सायंकाळी ०६.०० ते सकाळी ०६.०० या संचार ( संचारबंदी) करणेस प्रतिबंध
असेल. मात्र यामधून जीवनाश्यक वस्तूंचा ( दुध, भाजीपाला, फळे इतर) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व
अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना/व्यक्तींना कोवीड लसीकरणासाठी जाणा-या नागरीकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचा-यांना व त्यांनी ने-आण करणा-या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे.
● पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीतील
सर्व हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल,( Single Screen and Multiplex) नाट्यगृह,
स्विमिंगपूल, स्पा, व्यायामशाळा (जिम) व इ. आस्थापना दि.०३/४/२०२१ पासून ७ दिवस/ पुढिल आदेशापर्यंत
संपुर्णपणे बंद राहतील. तथापी, हॉटेलमार्फत पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.
●पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत
पीएमपीएमल सेवा(PMPML) दि. ०३/०४/२०२१ पासून ७ दिवसांसाठी बंद राहील. केवळ अत्यावश्यक सेवा
सुरू राहिल. उद्योग/खाजगी कार्यालयांनी त्यांचे कर्मचा-यांकरिता वाहतूक व्यवस्था त्यांचे स्तरावर करावी.
●सर्व औद्योगिक/वाणिज्यिक आस्थापनांनी RTPCR चाचणी प्रत्येक आठवड्यात करणे बंधनकारक राहिल.
●पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत
आठवडे बाजार दि. ०३/०४/२०२१ पासून ७ दिवसांसाठी बंद राहील.
●लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहिल. व अंत्यसंस्कार/दशक्रिया
व त्याच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहिल.
● पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम, सभा, संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन व
तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतात अशा प्रकारचे सर्व कार्यक्रमास संपूर्णत: प्रतिबंद राहिल.
●नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेणेत याव्यात.
● पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीतील सर्व धार्मिक
स्थळे दिनांक ०३/४/२०२१ पासून पुढिल ७ दिवस बंद राहील.
● पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीतील दि.
०३/०४/२०२१ पासून सर्व प्राथमिक, व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, यांचे नियमित वर्ग
दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहिल. नियोजित परिक्षा उदा. दहावी,
बारावी, एमपीएससी व इतर परिक्षा नियोजित वेळेत होतील. सर्व कोचिंग क्लासेस ( MPSC, UPSC वगळून)
दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद राहतील. MPSC, UPSC कोचिंग क्लासेस आसन क्षमतेच्या 50%
क्षमतेनुसार त्याकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटींच्या अधिन राहून सुरू राहतील.
● सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना
मुखपट्टी/मास्क वापरणे बंधनकारक असेल.
●नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान ६ फूटाचे अंतर राखणे बंधनकारक असेल.
व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणेत यावे.
●यापूर्वी या कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/ मार्गदर्शक सूचना सुरू राहतील.
विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची तंतोतंत अंमलबजावणी
करणेची जबाबदारी संबंधीत स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन,महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत,
नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद यांची राहील. तरी त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय विभाग
प्रमुख यांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा, १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व
नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी.
सदर आदेश दिनांक ०३/०४/२०२१ पासून दिनांक ०९/०४/२०२१ पर्यंत लागू करण्यात येत आहे. असा आदेश
(डॉ.राजेश देशमुख)
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे

error: Content is protected !!