कामशेत: येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैशाचाभरणा करण्यासाठी आलेल्या बाळू लक्ष्मण कोंढरे यांना तुमच्याकडेपाचशेची नोट खराब असून आपण नवीन स्लीप भरुया असे म्हणत१८ हजार लुबाडले. या प्रकरणी कोंढरे यांनी कामशेत पोलिस
ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरांमधील पुणे जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बाळु कोंढरे (वय ५५, रा. वळवंती,मावळ) हे उकसान सहकारी विकास सोसायटीच्या एकरकमी हप्ताभरण्यासाठी ४७ हजार रुपये घेऊन बुधवारी ( दि.३१) रोजी सकाळी ११
वाजण्याच्या सुमारास आले होते.यावेळी त्यांनी बँकेचे सचिव बाळासाहेब शिंदे यांच्याकडून स्लिपघेऊन रक्कम भरणे करता रांगेत उभे राहिले होते. यावेळी तुमच्या
हातातील पाचशे रुपयाची नोट खराब आहे, मी तुम्हाला नोटाचे नंबर स्लिपवर टाकून देतो असे म्हणत एका अज्ञात इसमाने स्लीप व पैसेजवळ घेतले. यावेळी त्याचा एक साथीदार त्या ठिकाणी आला व नोट खराब असल्याकारणाने तुम्ही भरणा स्लीपवर सही करा असे म्हणत कोंढरे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पैसे व स्लिप शिंदे यांना देऊन दोघेजण निघून गेले. त्यानंतर कोंढरे भरणा करण्यासाठी कॅशियर जवळ गेले असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या ३६ नोटा कमी असल्याचे शिंदे यांना समजले. दोन अज्ञात इसमांनी हात चलाखी करत
त्यांच्याकडून पैसे घेतल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र वाळुजकर हे करत आहेत.

error: Content is protected !!