वडगाव मावळ:
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांची
शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे .
तिथीनुसार साज-या होणा-या शिवजयंती उत्सवाची जनजागृती व माहितीसाठी साठी पोलीसांनी परिपत्रक प्रसिद्धीला दिले आहे,
यात म्हटले आहे की,वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ३१/०३/२०२१ रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव सण साजरा होत असतो. परंतु सध्याचे कोविड १९ चा प्रादुर्भाव अनुषंगाने “छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय, यांचे परिपत्रक क्रमांक – आर एल पी – ०३२१/प्र. क्र.९७/विशा- १ ब दिनांक २६ मार्च २०२१ छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीनुसार) २०२१ मार्गदर्शक सूचना परिपत्रक आले आहे. त्या अनुषंगाने खालील मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत.
• दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादी चे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
• त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रेक्षपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
• तसेच दर वर्षी प्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून सोशल डिस्टन्स चे पालन करावे.
•कोविड १९ चा प्रादुर्भाव अनुषंगाने शिवजयंती उत्सव मिरवणूक काढता येणार नाही.
•सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी आहे.
• यावर्षी कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करूयात
वरील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास कोविड १९ अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा सूचना सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस ठाणे जिल्हा पुणे ग्रामीण यांनी दिल्या आहेत.

error: Content is protected !!